आमच्याविषयी
कृषि विभागाकडील शासन निर्णय क्र एजीयू-1099/सीआर-44/99/19-ओ, दिनांक 9 जुलै 1999 अन्वये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कडून ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर दि.30 मार्च 2000 रोजी मा.सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे यांचेकडे 'ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था' या नावाने सदर संस्थेची नोंदणी करण्यात आली. 'ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था, मांजरी फार्म, पुणे' महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागातंर्गत एक स्वायत्त प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत आहे.
संस्थेमध्ये ग्रामसेवक संवर्गासाठी पायाभूत प्रशिक्षण (४५ दिवस) व उजळणी प्रशिक्षण (१२ दिवस) दिले जाते. संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्हा आहे. राज्य प्रशिक्षण धोरणातंर्गत संस्था पुणे जिल्ह्याकरिता जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत आहे.
संस्थेमध्ये गरजेनुसार शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांस प्रशिक्षण दिले जाते.
संस्थेचे कामकाज अध्यक्ष, नियामक मंडळ तथा मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे व मा. अध्यक्ष, कार्यकारी समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.
एकूण प्रशिक्षण कार्यक्रम
प्रशिक्षणार्थी संख्या
ग्रामप्रज्ञा मोबाईल ॲप नोंदणी संख्या
ऑनलाईन कोर्स पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीची संख्या
संस्थेची उद्दिष्ट्ये:
- 1. विकास योजनेशी संबंधित कर्मचा-यांना विकास योजनांबाबतची माहिती, कौशल्य व योजनाभिमुख दृष्टिकोन याबाबतचे .
- 2. विकास योजनेशी संबंधित कर्मचा-यांना व पदाधिकाऱ्यांना सेवांतर्गत प्रशिक्षण देणे तसेच याबाबत निरंतर शिक्षण केंद्र .
- 3. प्रशिक्षण केंद्राच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण विकास योजनांविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रमुख .
संदेश
संपर्क
पत्ता
ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था, मांजरी फार्म,पुणे,
पुणे-सोलापूर रोड , तालुका -हवेली ,
जिल्हा-पुणे, पिनकोड -४१२ ३०७
ई-मेल
gtcmpune@gmail.com
दूरध्वनी
७७९८९६१७९७